अखंड हरिनाम सप्ताह वडगाव पान 2023 ह.भ.प.रामराव महाराज ढोक (नागपूरकर) किर्तन
किर्तन सोहळा KIRTAN SOHALA किर्तन सोहळा KIRTAN SOHALA
50.3K subscribers
22,167 views
183

 Published On Sep 14, 2023

अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र वडगाव पान वर्ष १२६ वे किर्तनकार - विदर्भरत्न रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक (नागपूरकर), गायक- ह.भ.प.संतोष महाराज संबळे, ह.भ.प.गोरक्षनाथ महाराज जाधव , पखवाज - ह.भ.प.विक्रम महाराज शिरसाठ टाळकरी - समस्त भजनी मंडळ वडगाव पान समस्त ग्रामस्थ वडगाव पान.
राम कृष्ण हरी...!!!

या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.

आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.

कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.

कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.

कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
#dhokmaharaj
#dhokmaharajkirtan

show more

Share/Embed